Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना | पुढारी

Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना

वणी : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

वणीच्या जगदंबा माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. देवी मंदिरात आज तहसीलदांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. दिडोंरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी सपत्नीक महापूजा करत देवीची आरती केली. पुजारी सुधीर दवणे यांनी देवीची विधीवत पूजा केली.

मागची दोन वर्ष कोरोनामुळे नवरात्रोत्सवावर अनेक बंधने होती.  यावेळी सर्व निर्बंध हटवल्याने भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. आज पहिलीच माळ असल्याने अतिशय भक्तिमय वातावरण आहे. शेकडोंच्या संख्यने महिला घटी बसल्या आहेत. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

घटी बसणा-या महिलांसाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिराला व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी रोज साबुदाणा खिचडीची व्यवस्था देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान तहसीलदार पंकज पवार यांचा  ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, राकेश थोरात, गणेश देशमुख, रमेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, अमोल देशमुुुख, रविंद्र थोरात, तुषार देेशमुख, वणी मंडल अधिकारी गोविंद दुर्धवळे, तलाठी समाधान केंग, भास्कर कोरडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button