नाशिक : आईचे दूध पित असताना श्वास अडकून लहान मुलाचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on
Updated on

नाशिक : आईचे दूध पित असताना श्वास अडकून दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिव्यांशू सुनील लगड असे या चिमुकल्याचे नाव आहे.

मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यांशू यास सोमवारी (दि.11) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिव्यांशू हा आईचे दूध पित असताना त्याचा अचानक श्वास अडकला. त्यामुळे त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news