नाशिक : मिर्ची चौक झाला, जनार्दन स्वामी महाराज चौक

पंचवटी : बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण व चौकाच्या फलक अनावरणप्रसंगी अनिकेत शास्त्री महाराज, संतोषगिरी महाराज, दिनेश शास्त्री गायधनी, महंत सुधीरदास पुजारी, गौरव शास्त्री अगस्ते आदी धर्माचार्य व मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक (छाया: गणेश बोडके).
पंचवटी : बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण व चौकाच्या फलक अनावरणप्रसंगी अनिकेत शास्त्री महाराज, संतोषगिरी महाराज, दिनेश शास्त्री गायधनी, महंत सुधीरदास पुजारी, गौरव शास्त्री अगस्ते आदी धर्माचार्य व मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक (छाया: गणेश बोडके).

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद रोडवरील कैलासनगर परिसरात झालेल्या अपघातात १२ लोकांनी जीव गमावला आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली, त्याचवेळी परिसरातील नागरिकांनीही या चौकाचे सुशोभीकरण आणि सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. याच माध्यमातून या चौकाचे नामकरण शनिवारी (दि. 22) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक असे करण्यात आले आहे.

कैलासनगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने सर्वांचीच मने हेलावली, रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. केवळ सरकारी यंत्रणांच्या भरवशावर न राहाता, परिसरातील नागरिकांनी आता विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (दि. 22) सर्वधर्मीय गुरूंच्या उपस्थितीत अपघातग्रस्त चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या चौकाचा नामकरण सोहळाही पार पडला. नागरिकांनी या चौकाला 'राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रमांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

विश्वशांती प्रार्थना…..

बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विश्वशांती प्रार्थना करण्यात आली. त्यावेळी महंत स्वामी अनिकेतशास्त्री महाराज, संतोषगिरी महाराज, दिनेशशास्त्री गायधनी, महंत सुधीरदास पुजारी, गौरवशास्त्री अगस्ते, प्रवीणशास्त्री अगस्ते, फादर पिटर डिसुझा, अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, महंत चंदनदास महाराज, महंत बालकदास, कर्नल मुजूमदार, तुषार भोसले, राहुल बेळे, राहुल शुक्ल, कौस्तुभ जोशी, श्रीकांत शौचे, रामसिंग बावरी, किन्नर समाजाचे शिवपार्वती स्वरूप शुभांगी, संयुक्त धर्म परिषद महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. भानुदास शौचे यांच्यासह माजी नगरसेवक उद्धव निमसे, मधुकर जेजूरकर, रामभाऊ सूर्यवंशी, योगेश बर्वे यांच्यासह संत, महंत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news