कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची केंद्रावर टीका | पुढारी

कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. विविध राज्यातून फिरणाऱ्या या यात्रेमुळे पक्षाला समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘भारत जोडो यात्रा’चा प्रभाव दिसून येत आहे. पंरतु, ७५ हजार नोकऱ्या म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे, असा टोला कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोजगार मेळाव्याला सुरूवात केली. या कार्यक्रमातून ७५ हजार युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावर कॉंग्रेसने टीकास्त्र डागले आहे.

किमान पंतप्रधानांनी बेरोजगारी आहे हे स्वीकारले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचे हे पहिले यश आहे.आतापर्यंत ते सातत्याने बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करीत आले असल्याचे सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला म्हणाले, मोदीजींनी दर वर्षी दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.या हिशोबाने गेल्या ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्या देणे अपेक्षित होते.पंरतु, ३० लाख रिक्त सरकारी पदे कधीपर्यंत भरली जातील यासंदर्भात तारीख आणि वेळ पंतप्रधानांनी सांगावा. युवकांना रोजगार हवा आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा 

Back to top button