नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी

नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरात शुक्रवारी (दि. १४) आयोजित 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी मंडप उभारणीस वेग आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात एकाच छताखाली लाभार्थींना विविध शासकीय याेजनांचा लाभ वितरित केला जाणार आहे. तसेच रोजगार मेळावा व आरोग्य शिबिरही कार्यक्रमस्थळी पार पडणार आहे. राज्याच्या तिन्ही प्रमुखांसह तब्बल अर्धा डझन मंत्री यानिमित्ताने नाशिकमध्ये हजेरी लावणार असल्याने प्रशासनाने कार्यक्रमाच्या सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ३५ ते ४० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पावसाचे दिवस आणि अपेक्षित गर्दीचा आकडा विचारात घेता कार्यक्रमस्थळी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यास प्रारंभ झाला आहे. याशिवाय मैदानावर चिखल होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी कच टाकण्यात येत आहे. तसेच परिसरातील रस्ते डागडुजीसह व्हीव्हीआयपींच्या ताफ्याचा मार्ग, कार्यक्रमस्थळी उभारायचे स्टॉल्स‌् यासह अन्य बाबींवर प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि मैदानाची क्षमता बघता प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी वरुणराजाची कृपा व्हावी. यासाठी अधिकारी देवाचा धावा करत आहेत.

पार्किंगचा प्रश्न जटील

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिक शहर व ग्रामीण भागातून लाभार्थींना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या ५०० व स्मार्ट सिटीच्या १०० बसेसची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते खासगी वाहनाने शहरात येतील. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी पार्किंगसह शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनणार आहे. या समस्येतून मार्ग कसा काढायचा या विवंचनेत अधिकारी सापडले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news