वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजारात हर्षोल्हास | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजारात हर्षोल्हास

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

एक जुलै 2027 रोजी भारत सरकारकडून जीएसटीची Good and Services Tax अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार इतर व्हॅट, सर्व्हिस टॅक्स वगैरे अप्रत्यक्ष करांची सद्दी सपंली आणि जीएसटीच्या रूपाने करसंकलनात सुलभता आणि पारदर्शकता आली. पुढे e-way bills आणि e-invoice च्या माध्यमांतून जीएसटीच्या संकलनाला आधुनिकतेची जोड मिळाली.

हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे 1 जुलै रोजी जून 2023 चा जीएसटी संकलनाचा आकडा जाहीर झाला. आणि तो होता 1,61,497 कोटी रुपये. बाजाराने याचे हर्षोल्लासात स्वागत केले नसते तरच नवल! शुक्रवार, दिनांक 7 जुलै रोजी निफ्टी या सप्ताहात 0.74 टक्क्यांनी वाढून 19331.80 वर बंद झाला. परंतु याच दिवशी निफ्टीने 19518.80 च्या उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 2.60 टक्केंनी वाढला. सेक्टरला, निर्देशांकांमध्ये निफ्टी एनर्जी व निफ्टी रिअ‍ॅल्टी हे निर्देशांक वाढले तर आयटी निर्देशांक जैसे थे बंद झाला. इंडियन ऑईल (8.65%), बीपीसीएल (7.39%), रिलायन्स (3.27%) आणि टाटा पॉवर (2.77%) या शेअर्सनी दमदार वाढ नोंदवत एनर्जी इंडेक्सला वरती जाण्यास मदत केली.

रिअ‍ॅल्टी सेक्टरमध्ये सोभा डेव्हलपर्सचा शेअर 7.30 टक्क्यांनी वाढून 576.20 वर बंद झाला. इन्फ्रा आणि रिअ‍ॅल्टी सेक्टर्स सध्या तेजीत आहेत. मागील तीन महिन्यांत निफ्टी इन्फ्रा इंडेक्स 12.30 टक्के, तर निफ्टी रिअ‍ॅल्टी इंडेक्स 31.53 टक्के वाढला. भारतामध्ये प्रसिद्ध असणार्‍या गुंतवणूक तज्ज्ञांपैकी मुकूल अग्रवाल हे एक प्रख्यात गुंतवणूकदार आहेत. पेनी स्टॉक्समध्ये मल्टी बगर्स शोधणारा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीबरोबरच ट्रेडिंगमध्येही रमणारा धाडसी गुंतवणूकदार म्हणून त्यांची ख्याती आहे. जून 2023 मध्ये त्यांनी Capacite Infraprojects मध्ये तब्बल 2.42 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली.

Ace Investors हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ट्रेडिंग आणि अभ्यास करणार्‍यांसाठी मनोरंजक प्रकरण असते. Ace Investors म्हणजे मोठे, यशस्वी गुंतवणूकदार वेगाने वाढणार्‍या शेअर्समध्ये ते गुंतवणूक करतात. त्यांचे फंडामेंटल अ‍ॅनालिसीस, टेक्निकल अ‍ॅनालिसीस यांचे ज्ञान थक्क करणारे असते. जोखीम स्वीकारण्याची तयारी असते. एकदा शेअर्स निवडले की, दीर्घकाळ वाट पाहण्याची चिकाटी त्यांच्याजवळ असते. असे Ace Investors कोणते शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडतात, कोणते शेअर्स विकतात, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवतात, याकडे गुंतवणूकदारांनी सतत लक्ष दिले पाहिजे. राधाकिशन दमामी, राकेश झुणझुणवाला, आकाश भन्साळी, मुकूल अग्रवाल, आशिष धवन हे काही भारतातील बडे गुंतवणूकदार आहेत.

Olectra Greentech हे शेअर या सप्ताहात पावणे सत्तावीस टक्के वाढला. एका महिन्यात हा शेअर 59 टक्के, तर तीन महिन्यांत 87 टक्के वाढला आहे. शुक्रवारचा त्याचा बंदभाव रु. 1231.95 असून 52 week high च्या पातळीवर तो ट्रेंड करतो आहे. इलेक्ट्रीकल बसेसची निर्मिती ही कंपनी करते. कंपनीला इलेक्ट्रीकल बसेसच्या मिळालेल्या मोठ्या ऑर्डर्स पाहता, बघता बघता हा शेअर 2000 चा आकडा गाठेल, असे वाटते. हैदराबादमधील सीतारामपूर येथे 150 एकर जागेमध्ये कंपनी Electrical Vehical Manufacturing युनिट उभारत आहे.

या आठवड्यात M & M महिंद्र आणि महिंद्र हा शेअर 7.61 टक्के वाढला. ऑटोमोबाईल सेक्टरमधील भारतातील सर्वात अधिक Diversified Presence असणारी ही कंपनी आहे. टू व्हीलर्स, थ्री व्हीलर्स, प्रायव्हेट व्हेईकल्स, कमर्शिअल व्हेईकल्स, ट्रॅक्टर्स, अर्थमुव्हर्स असा तिचा मोठा Product Portfolio आहे. पॅसेंजर व्हेईकल्स, थ्री व्हीलर्स यांच्या विक्रीत दरमहा होणारी वाढ 2022-23 मध्ये कंपनीने दाखविलेली दमदार कामगिरी प्रायव्हेट कार सेगमेंटमध्ये कंपनीकडून Launch होणारी नवनवीन मॉडेल्स यामुळे गुंतवणूदारांना या शेअरमध्ये खूप मोठे Growth Prospect दिसते आहे. या शेअरमध्ये FII holding 39 टक्के, तर DII holding 28 टक्के आहे. शुक्रवारचा शेअरचा बंदभाव रु. 1564 आहे. हा शेअर अगदी अल्पावधीत 2000 चा आकडा पार करेल, यात शंका नाही.

Back to top button