नाशिक : 13 तोळ्यांचे दागिने प्रवासात बॅगेतून लंपास

नाशिक : 13 तोळ्यांचे दागिने प्रवासात बॅगेतून लंपास
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड ते सिन्नर बसस्थानक या एसटी प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेतून जवळपास 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (दि.28) सकाळी 10.30 ते 11 च्या सुमारास घडली.

नरेश नारायण माहेवार (52, रा. स्वामी समर्थनगर, सिन्नर) व कुटुंबीय गावाहून येत असताना त्यांनी त्यांच्याजवळील 5 तोळे वजनाची सोन्याची पोत, दीड तोळ्याची सोन्याची पोत, 3 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण साडेबारा तोळ्यांचे सोन्यांचे दागिने व 3 भाराच्या चांदीच्या तोरड्या व 2 हजारांची रोकड आपल्याजवळील बॅगेमध्ये ठेवले होते.  ते नाशिकरोड बसस्थानकावरून सिन्नरला येण्यासाठी एसटीमध्ये बसले, तेव्हा बॅगेत दागिने होते. मात्र, नाशिकरोड ते सिन्नरपर्यंतच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने बॅगेतील दागिने व रोकड घेऊन पोबारा केला.  माहेवार व कुटुंबीये सिन्नर बसस्थानकावर उतरले असता त्यांनी बॅगेतील दागिने बघितले असता दागिने व रोकड लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.  चोरीमुळे माहेवार यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, पोलिसांनी तत्काळ चोरट्याचा शोध घेऊन दागिने परत मिळवून देण्याची विनंती माहेवार यांनी केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news