नाशिक : सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी जाधव

सिन्नर : सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन जाधव यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना रामभाऊ लोणारे, डॉ. संदीप मोरे, अमोल चव्हाणके आदींसह सदस्य.
सिन्नर : सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन जाधव यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना रामभाऊ लोणारे, डॉ. संदीप मोरे, अमोल चव्हाणके आदींसह सदस्य.

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.

डॉ. संदीप मोरे यांनी नितीन जाधव यांच्या नावाची सूचना मांडली व संजय आणेराव यांनी त्यास अनुमोदन दिले. माजी अध्यक्ष मुकेश चव्हाणके यांनी सायकल चळवळ वाढावी व दरवर्षी नवीन तरुणांना संधी मिळावी म्हणून नवीन अध्यक्ष नेमण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी संदीप ठोक, सचिवपदी उदय साळी, सहसचिवपदी भास्कर गोजरे, खजिनदारपदी मुकेश चव्हाणके, प्रवक्तापदी सुभाष कुंभार यांची एकमताने निवड करण्यात आली. नितीन जाधव आणि योगेश थोरात यांनी नुकतीच 400 किमी बीआरएम सायकलिंग करून आल्याबद्दल तसेच डॉ. संदीप मोरे यांनी हिमालयातील पांगरचुला हा 15,500 फुटांवरील खडतर ट्रेकपूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल चव्हाणके, नंदकिशोर निर्‍हाळी, शिवाजी लोंढे, संतोष कदम, निलेश गावंड, डॉ. आरोटे, डॉ. कांडेकर, दत्ता ढोबळे, किसन लोणारे आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.

1 जुलैला सिन्नर ते पंढरपूर सायकलवारी – यावेळी सिन्नर ते पंढरपूर वारीच्या नियोजनावर चर्चा झाली. सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनतर्फे दि. 1 ते 3 जुलै रोजी पंढरपूर सायकलवारीचे नियोजन डॉ. संदीप मोरे, रामभाऊ लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news