नाशिक : ईदगाह स्वच्छतेसह जनावरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश

मालेगाव : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांना सूचना करताना उपआयुक्त राजू खैरनार.
मालेगाव : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांना सूचना करताना उपआयुक्त राजू खैरनार.

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा : येऊ घातलेल्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली. त्यात शहरातील 12 ईदगाह मैदानांची स्वच्छता करण्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

उपआयुक्त राजू खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सहायक आयुक्त सचिन महाले, अनिल पारखे, सुनील खडके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, बांधकाम, अतिक्रमण यासह इतर विभागांना कामकाजासंदर्भात सूचना करण्यात आल्या. मुस्लीमधर्मीय ईदला लष्कर, कल्लूशाह, इमाम अहमद रजा, सय्यद इजहार अशरफ, छोटी ईदगाह, खलील हायस्कूल, बहेतुउलम, तजवीजूल कुराण, मुफ्ती आजम, मिल्लत मदरसा, भिकन शाह, सनाउल्लानगर अशा एकूण 12 ईदगाह मैदानांवर सामुदायिक नमाज पठणासाठी एकत्र येत असतात. या मैदानांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांना नियोजन देण्यात आले. शहरातील रस्ते व गटारी, नाल्यांची साफसफाई करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, असे ठणकावण्यात आले. पाणीपुरवठा विभागाने दैनंदिन पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा. बांधकाम विभागाने ईदगाह मैदानांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मलेरिया विभागाने शहरात फवारणी करावी. पथदीप सुरळीत ठेवण्याबाबत विद्युत विभागाला सज्ज करण्यात आले. उद्यान विभाग ईदगाह मैदानांवरील व प्रार्थनास्थळांच्या आजूबाजूचे गवत, झुडपे काढून घेणार आहे.

बैठकीला उपअभियंता एस. टी. चौरे, प्रभाग अभियंता मंगेश गवांदे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहम्मद, उमेश सोनवणे, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, शहर समन्वयक अक्षय थोरात, स्वच्छता निरीक्षक गोकुळ बिर्‍हाडे, प्रेम शिंदे, अमित सौदे, संदीप कापडे, मनीष कापडे, श्याम सोनवणे, ईसा बेग, विकास वाल्हे, सुनील गंगावणे, मनीष ठाकरे, निशांत संसारे, कपिल परदेशी, शेख मजहर, कलिम सय्यद, विकी देवरे, लिपिक दिलीप मोरे, योगेश नेरकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news