नाशिक : लग्न लावून देणार्‍या मध्यस्थाने एक लाखाला गंडवले ; लग्नानंतर मुलगी पसार | पुढारी

नाशिक : लग्न लावून देणार्‍या मध्यस्थाने एक लाखाला गंडवले ; लग्नानंतर मुलगी पसार

नाशिक  (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
उपवर मुलाच्या लग्नासाठी उपवर मुलगी बघून देण्यासाठी एका मध्यस्थाने एक लाख घेऊन फसवणूक केल्याची घटना नुकतीच ब्राह्मणवाडे येथे घडली. याबाबत वृद्धेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, लग्नानंतर नवरीही माहेरी निघून गेल्याने या कुटुंबाला धक्का बसला आहे.

ब्राह्मणवाडे येथील इंदूबाई छबू गिते (65) यांनी उपवर मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी गावातील साहेबराव विठ्ठल गिते यांना 1 लाख रुपये दिले होते. त्यानुसार त्याने इंदूबाई यांच्या मुलाचे एका मुलीसोबत लग्न लावून दिले. नवरी सासरी नांदत असताना काही दिवसांनी साहेबराव गिते तिला घेऊन गेले. त्यानंतर ती सासरी आलीच नाही. इंदूबाई व कुटुंबीयांनी सुनेला सासरी येण्याची विनंती करूनही तिने नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावर इंदूबाई यांनी साहेबराव यांच्याकडे मुलगी बघून देण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी साफ नकार दिल्याने इंदूबाई गिते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात साहेबराव गिते यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button