नाशिक : पोलिस व मनपा प्रशासनाकडून रथ मार्गाची पाहणी

पंचवटी : रथ मार्गाची पाहणी करताना पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त
डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनवणे, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, स्मार्ट सिटी कंपनीचे उपव्यवस्थापक किसन कानडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू.(छाया : गणेश बोडके)
पंचवटी : रथ मार्गाची पाहणी करताना पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनवणे, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, स्मार्ट सिटी कंपनीचे उपव्यवस्थापक किसन कानडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू.(छाया : गणेश बोडके)
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
रामनवमीनंतर येणार्‍या भागवत एकादशीला नाशिकचा प्रसिद्ध रथोत्सव साजरा केला जातो. यात श्रीराम व गरुड असे दोन रथ सहभागी होत असतात. यावर्षी हा रथोत्सव रविवारी, दि. 2 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, सुरक्षेच्या दृष्टीने या रथ मार्गाची सोमवारी (दि.27) पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने पोलिस अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. या पाहणीत रथोत्सव समिती व काळाराम संस्थानचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या पाहणी दौर्‍यात पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनवणे, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, स्मार्ट सिटी कंपनीचे उपव्यवस्थापक किसन कानडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू, काळाराम संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी यांच्यासह रथोत्सव समिती पदाधिकारी सहभागी झाले होते. श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सोमवारी या रथमार्गाच्या पाहणी दौर्‍याला सुरुवात झाली. श्रीराम व गरुड रथ ज्या मार्गाने नेले जातात अशा नाग चौक, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गौरी पटांगण, गाडगे महाराज पुलाखालील भाग, रोकडोबा तालिम, नेहरू चौक, म्हसोबा पटांगण, सरकारवाडा, भांडीबाजार, कपूरथळा मैदान, कपालेश्वर चौक या भागातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे दोन्ही रथांची पाहणी करून, रथ मिरवणुकीच्या वेळी येणार्‍या अडीअडचणी मंदिर विश्वस्तांकडून जाणून घेतल्या. या पाहणी दौर्‍याच्या वेळी उपस्थित असलेल्या स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना रथांच्या मिरवणुकीच्या मार्गावरील सध्या रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्याच्या तसेच अनावश्यक खडी-मुरूम उचलून घेण्याच्या, उतार सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या भागात विद्युत तारा खाली आहेत, त्या उंच करून घ्याव्यात. मिरवणूक मार्गातील अतिक्रमणे हटवावीत, अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स काढावेत, मिरवणूक मार्गातील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करावी आदी कामे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news