नाशिक : कॅम्पसला इट राइट कॅम्पस प्रमाणपत्रांचे वाटप प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत मान्यवर.
नाशिक : कॅम्पसला इट राइट कॅम्पस प्रमाणपत्रांचे वाटप प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत मान्यवर.

नाशिक : पालकमंत्र्यांच्या हस्ते हायजिन रेट्रिंग, इट राइट कॅम्पस प्रमाणपत्रांचे वाटप

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अन्नव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी हायजिन रेट्रिंग व इट राइट कॅम्पस ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा कॅम्पसला इट राइट कॅम्पस आणि नऊ आस्थापनांना हायजिन रेट्रिंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्लीच्या इट राइट कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे आदी उपस्थित होते. इट राइट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आस्थापनांची व कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता, कामगारांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी व अन्नपदार्थांची गुणवत्ता यांना प्राध्यान्य देण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, ढाबा, बेकरी, मिठाई दुकाने, किरकोळ विक्री करणारे चिकन व मटन आस्थापनांना तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठे आस्थापना व रुग्णालयाच्या कॅम्पसमधून सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थास चालना देणार्‍यांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.

इट राइट कॅम्पस प्रमाणपत्राचे मानकरी असे…
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठ
एस.एम.बी.टी. मेडिकल सायन्स कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर
महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कॅम्पस
दिलासा प्रतिष्ठान
सपकाळ नॉलेज हब प्रशासकीय अधिकारी व प्राचार्य
इपिरॉक मायनिंग इंडिया प्रा. लि.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news