नाशिक : श्रीपाद बाबा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

घोटी : श्रीपाद बाबा दिंडी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. (छाया ः राहुल सुराणा)
घोटी : श्रीपाद बाबा दिंडी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. (छाया ः राहुल सुराणा)
Published on
Updated on

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
येथे राष्ट्रसंत श्री श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हरिनाम सप्ताह व रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कीर्तन प्रवचनांची मांदियाळी सुरू आहे. बुधवारी (दि. 4) सोहळा समारोपाच्या पूर्वसंध्येला हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.

हा सोहळा हजारो भक्तांनी नजरेत सामावून घेत आनंद व्यक्त केला. सोहळ्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून अनेक दिंड्या आल्या. हजारो साधक भाविक आठवडाभरापासून सहभागी झाले. अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने झाली. त्यामुळे या वैष्णव मेळाव्यात कीर्तन प्रवचनातून गुरूची, सद्गुरूंची सेवा करत साधकांनी घोटीनगरी भक्तिमय केल्याचे चित्र निर्माण झाले. सोहळ्याच्या अखेरच्या टप्प्यात कीर्तन, प्रवचन झाल्यानंतर दुपारी हेलिकॉप्टरच्या मदतीने सोहळा समारंभावर व श्रीपाद बाबांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत साधक भक्तांनी एकच जल्लोष केला. भक्तिमय वातावरणात साधक भक्तांनी पालखी व दिंडी मिरवणूक काढली. हरिनामाचा गजर, श्रीपाद बाबा, रामदास बाबांचा जयजयकार करत हजारो भाविकांनी गुरुचरणी भाव समर्पण केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news