नाशिक : टाकळीतील खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे म्हणजे ‘दिव्यच’

नाशिकरोड : माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवासस्थानाजवळील रस्त्याची झालेली दुरवस्था.(छाया : उमेश देशमुख)
नाशिकरोड : माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवासस्थानाजवळील रस्त्याची झालेली दुरवस्था.(छाया : उमेश देशमुख)
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
माजी महापौर अशोक दिवे यांचे टाकळी गावात निवासस्थान आहे. रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या निवासस्थानाजवळ मोठे खड्डे आहेत. त्यामुळे दुचाकी अन् चारचाकी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. सध्या प्रशासकीय राजवट असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

जेलरोडचा इंदिरा गांधी चौक ते टाकळी गाव, औरंगाबाद ते टाकळी गाव, नाशिक-पुणे रोड ते टाकळी गाव द्वारका ते टाकळी गाव, उपनगर ते टाकळी गाव या रस्त्यांना जोडणार्‍या टाकळी गावातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. माजी महापौर अशोक दिवे यांचे निवासस्थान असलेल्या चौकाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसतात. महापालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news