नाशिक : विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष संवाद ; आरोग्य विद्यापीठाचा ’कुलगुरू का कट्टा’

नाशिक : आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर. समवेत मान्यवर व विद्यार्थी.
नाशिक : आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर. समवेत मान्यवर व विद्यार्थी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणार्‍या शैक्षणिक समस्या, अडचणी समजून घेत त्यांचे निराकरण होण्यासाठी प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

आरोग्य विद्यापीठातर्फे 'कुलगुरू का कट्टा' उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा यासाठी 'कुलगुरू का कट्टा' उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या, तक्रारी व सूचना समजून घेऊन त्यांची दखल यापुढे विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी होस्टेलमधील अडचणी, स्वच्छतागृहे याबद्दलच्या तक्रारी मांडल्या, त्याबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कळविण्यात येईल, असे कानिटकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे मत, सूचना व तक्रारींमधून महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. त्यानुसार कार्यपद्धतीत सुधारणा करणे शक्य होईल. तसेच विद्यापीठाकडून निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही कानिटकर यांनी दिली. डॉ. मिलिंद निकुंभ यांनी, 'कुलगुरू का कट्टा' उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमाने विद्यापीठ प्रयत्न करेल, असे सांगितले. डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केलेल्या कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news