साडीत खुलले जान्हवीचे सौंदर्य! | पुढारी

साडीत खुलले जान्हवीचे सौंदर्य!

पुढारी ऑनलाईन : एके काळी बॉलीवूडमध्ये ‘झीरो फिगर’चे फॅड आले होते. सर्वात प्रथम करिश्मा कपूरने हा प्रकार अवलंबला व नंतर करिनाने तिच्या पावलावर पाऊल टाकले. करिश्मा अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदीच सडपातळ दिसत होती. असे अगदीच बारीक असणंही फारसं चांगलं दिसत नाहीच.

करिश्मा तशीच (आजारी व्यक्‍तीसारखी) दिसत होती; पण आता तिनेही थोडे वजन वाढवल्याचे तिच्या सलमान खानबरोबरच्या ताज्या फोटोंमधून दिसून येते. या फोटोंमध्ये ती अधिक तरुण, टवटवीत आणि उत्साही दिसून येते. जान्हवी कपूरनेही आपले वजन थोडे वाढवले आहे हे तिच्या काही नव्या फोटोशूटमधून दिसून आले आहे. आता जान्हवी कपूरने हलक्या हिरव्या रंगाच्या साडीतील आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हे फोटो पाहिल्यावर अनेकांना ‘मिस्टर इंडिया’च्या श्रीदेवीची आठवण झाली असल्यास नवल नको! जान्हवी पाश्‍चात्त्य पोशाखातही सुंदर दिसते आणि भारतीय पेहरावातही. ही तिला तिच्या आईकडून वारशाने आलेली देणगी आहे, असेच म्हणावे लागेल!

हेही वाचलंत का? 

Back to top button