मुंबई : ऊर्जामंत्र्यांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक; गुन्हा दाखल | पुढारी

मुंबई : ऊर्जामंत्र्यांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक; गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं सांगत, विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने ११ जणांकडून पैसे घेतले असून याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसानी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संदीप राऊत असं या संशयिताचं नाव आहे.

आरोपी संदीप राऊत याने आपण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितले होते. तसेच राऊत आपले काका असून, विद्युत विभागात तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत आरोपी राऊतने ११ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील दादर पोलिसांनी संदीप राऊत या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऊर्जामंत्री राऊत यांचं नाव सांगत संशयिताने फसवणूक केल्याने नागरिकांच्यात संताप व्यक्त होत आहे. आरोपी संदीपला अटक करण्यात आली की नाही, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Back to top button