नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने

नाशिक : महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी निषेध नोंदवताना विविध शिवप्रेमी संघटना. (छाया: हेमंत घोरपडे).
नाशिक : महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी निषेध नोंदवताना विविध शिवप्रेमी संघटना. (छाया: हेमंत घोरपडे).

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

महाराष्ट्र राज्य व्देषी विधान तसेच महापुरुषांच्या नावे होणारी बदनामी याबाबत संबंधितांवर तत्काळ कारवाई होणेबाबत विविध शिवप्रेमी संघटना एकवटल्या असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि येथील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य होत असल्याने राज्यपाल भगतसिंग काेश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध शिवप्रेमी संघटनांकडून निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी संभाजी बिग्रेडचे चंद्रकांत बनकर, नितिन रोठेपाटील, प्रफुल्ल वाघ, शरद लबडे, सागर पाटील, करण गायकर, हिरामण वाघ आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे काही गावे कर्नाटकमध्ये विलीन करण्याचा मुख्यमंत्री बोम्बई यांनी घाट घातला असून त्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून निषेध नोंदवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके यांसह आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news