पुणे : सोलापूरची बोरे खातायेत भाव! | पुढारी

पुणे : सोलापूरची बोरे खातायेत भाव!

पुणे : ढगाळ वातावरणामुळे मार्केट यार्डातील फळबाजारात सोलापूर जिल्ह्यातून चेकनट, चमेली व उमराण आदी बोरांची आवक वाढली आहे. याखेरीज बाजारात लिंबेही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यातुलनेत मागणी कमी असल्याने बोरांचे भाव दहा ते पंधरा टक्क्यांनी तर लिंबांचे भाव 15 किलोंच्या गोणीमागे 50 रुपयांनी उतरले आहेत. थंडीमुळे मागणी घटल्याने अननसाच्या भावात डझनामागे शंभर रुपये तर मागणी वाढल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

रविवारी (दि. 11) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, संत्री 25 ते 30 टन, मोसंबी 40 ते 50 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबे सुमारे 4 हजार ते 5 हजार गोणी, पेरू 1200 ते 1300 क्रेटस, कलिंगड 7 ते 8 गाड्या, खरबुज 3 ते 4 गाड्या, बोरे 1 ते दीड हजार पोती तर सिताफळाची 10 ते 15 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 100-250, अननस : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 320-550, (4 डझन) : 120-260, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 80-250, गणेश : 10-50, आरक्ता 60-120. कलिंगड : 7-10, खरबूज : 20-30, पपई : 12-25, पेरू (20 किलो) : 250-350, चिक्कू (10 किलो) : 100-500, सिताफळ : 20-150, बोरे (10 किलो) : चेकनट : 450-550, उमराण : 80-120, चमेली : 180-250.

Back to top button