Nashik Crime : धारदार शस्त्रासह तडीपार गुंड ताब्यात

Nashik Crime : धारदार शस्त्रासह तडीपार गुंड ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडास धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मोहम्मद अन्वर सय्यद (रा. नानावली) असे या गुंडाचे नाव आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अंमलदार समीर चंद्रमोरे हे गस्त घालत असताना त्यांना भद्रकाली पोलिस ठाण्याकडील तडीपार गुंड मोहम्मद सय्यदची माहिती मिळाली. मोहम्मद हा एमएच १५, एचडी ८७८६ क्रमांकाची दुचाकी घेऊन द्वारका हॉटेलच्या बाजूकडील सर्व्हिस रोडवर फिरत असल्याचे समजले. त्यानुसार चंद्रमोरे यांनी वरिष्ठांना ही माहिती देत इतर अंमलदाराच्या मदतीने सापळा रचला. त्यानुसार अंमलदार शेरखान पठाण, किशोर देसले, रामकृष्ण वाघ, गणेश वाघ, संदीप पवार यांनी ट्रॅक्टर हाउससमोरील सचिन ट्रॅक्टर समोर दुचाकीसह मोहम्मदला पकडले.

दुचाकीची तपासणी केली असता पाठीमागील सीटखाली धारदार स्टीलचा चॉपर मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद यास पकडून त्याच्याकडील दुचाकी व शस्त्र असा सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news