पुणे : रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात तब्बल 80 जणांची फसवणूक

पुणे : रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात तब्बल 80 जणांची फसवणूक
Published on
Updated on

रांजणगाव गणपती : पुढारी वृत्तसेवा : येथील औद्योगिक वसाहतीतील 'हायर अपलायन्सेंस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने बिहार येथील भागलपूर या ठिकाणी आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या 80 विद्यार्थ्यांची दोघांनी फसवणूक केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत एचआर एडमिन मॅनेजर प्रणय सूर्यकांत धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 15) सकाळी 11 वाजेच्या सुमारास तीन युवक हायर अपलायन्सेंस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या गेटवर आले. त्यांनी त्यांच्याकडे असलेले जॉइनिंग ऑफर लेटर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दाखवले. परंतु, त्याला त्या जॉइनिंग लेटरबाबत शंका आल्याने त्याने ते लेटर एच. आर. मॅनेजर अंकलेश महाले आणि एच. आर. एडमिन मॅनेजर प्रणय धुमाळ यांना दाखवले. या 'ऑफर लेटरवर' हायर कंपनीचे नाव व शिक्का वापरून बनावट 'जॉइनिंग ऑफर लेटर' कोणीतरी तयार करून मुलांना दिले असून, त्यांची फसवणूक केली असल्याचे या दोघांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी त्या तीन युवकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या बिहारमधील भागलपूर येथील आयटीआय कॉलेजमध्ये दि. 5 जून रोजी राहुल गौतम गरामी आणि सुमन तितास मंडल (रा. जमालपूर, पश्चिम बंगाल) हे आले होते. त्यांनी आमच्या कॉलेजमधील शिक्षकांना हायर कंपनी, पुणे येथून आल्याचे सांगून आमच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना हायर कंपनीचे दि. 16 रोजी जॉयनिंगचे ऑफर लेटर दिले.

या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 5 हजारांप्रमाणे एकूण 4 लाख रुपये विद्यार्थ्यांना हायर कंपनीच्या नावाने बनावट सही-शिक्के वापरून जॉयनिंग ऑफर लेटर दिल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीचे प्रणय सूर्यकांत धुमाळ यांनी तत्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रह्म पोवार, पोलिस जवान रघुनाथ हळनोर यांनी तत्काळ कारवाई करीत या दोन भामट्यांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news