नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम

नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम
Published on
Updated on

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचे आगार बनलेल्या ब्लॅकस्पॉटचे ग्रीन स्पॉटमध्ये रूपांतरित करण्याचा विडा घंटागाडी कर्मचारी आणि वॉटरग्रेसचे व्यवस्थापक विजय जमदाडे यांनी उचलून तो संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल या सर्वांचे उद्योजकांबरोबरच सर्वच थरातून स्वागत होत आहे.

घंटागाडीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी 10 झाडे दत्तक घेतले. आधी वेअरहाऊससमोरील ब्लॅकस्पॉटची साफसफाई करून हा परिसर चकाचक केला. नंतर दत्तक घेतलेली झाडे तेथे लावली आणि ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आम्ही कचरा उचलण्याचे कार्य करीत असलो तरी आम्हालासुद्धा सर्व परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित असावा असे वाटते आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले तेव्हा सर्वाना अक्षरशः गहिवरून आले.

आयमाने घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. स्वच्छतेबद्दल कळकळ असलेल्या आणि इतरांपुढे आदर्श घालून देणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना खरोखरच सलाम. त्यांचा हा आदर्श इतरांनी घेतल्यास स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक निश्चितच अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी व्यक्त केला. आयमातर्फे त्यांचा यथोचित गौरव केला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news