नाशिक : आडगावकरांनी ‘एक गाव बारा भानगडी’ला दिला फाटा

बिनविरोध निवडीनंतर गावातील मारुती मंदिरात नूतन संचालकांच्या स्वागतप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक व माजी संचालक.
बिनविरोध निवडीनंतर गावातील मारुती मंदिरात नूतन संचालकांच्या स्वागतप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक व माजी संचालक.
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
'एक गाव बारा भानगडी' या म्हणीला फाटा देत आडगावकरांनी विविध कार्यकारी सहकार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून सामाजिक एकजुटीचे दर्शन घडविले आणि आर्थिक बचतही केली आहे. संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे २५ वर्षानंतर प्रथमच ही निवडणूक बिनविरोध झाली.

संस्थेचे माजी चेअरमन प्रभाकर लभडे, विष्णू शिंदे, सोमनाथ शिंदे, रंगनाथ लभडे, माजी पोलीस पाटील एकनाथ मते, दौलत शिंदे, शांताराम माळोदे, अभय माळोदे, अतुल मते, संदीप लभडे, सुदाम हळदे, बालाजी माळोदे आदींनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गटातून चिठ्ठी टाकून संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वच संचालकांची निवड बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीसाठीच्या खर्चात बचत करून सोसायटीने चांगला पायंडा पाडला. या निवडीचे गाव शिवारातील शेतकरी सभासदांनी स्वागत केले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे व बिनविरोधसाठी माघार घेतलेल्या सर्वांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

नवनियुक्त संचालक मंडळ…
भाऊसाहेब शिंदे, गणपत शिंदे, रजनी शिंदे, सुरेश वसंत माळोदे, कमल माळोदे, ज्ञानेश्वर माळोदे, योगेश मते, भिकाजी मते, भिवशन लभडे, तुकाराम लभडे, शिवाजी साठे, बापू जाधव, विक्रम शिरसाठ.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news