नाशिक : इंदिरानगरला महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली

नाशिक : इंदिरानगरला महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर येथील सोनवणे मळा परिसरात सोमवारी (दि.२३) रात्री चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वाती सचीन साखला (रा. सोनवणे मळा) यांच्या फिर्यादीनुसार त्या सोमवारी रात्री जेवनानंतर फिरण्यासाठी घराबाहेर आल्या.

त्यावेळी पाठीमागून एक पादचारी चोर आला व त्याने स्वाती यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची पोत ओरबाडून पळाला. त्यानंतर एका दुचाकीवरून तिघे संशयित लोटस हाऊसच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news