Kerala Rally : मुलांचा मनात धार्मिक द्वेषाची भावना वाढत आहे : केरळ उच्‍च न्‍यायालयाने व्‍यक्‍त केली चिंता | पुढारी

Kerala Rally : मुलांचा मनात धार्मिक द्वेषाची भावना वाढत आहे : केरळ उच्‍च न्‍यायालयाने व्‍यक्‍त केली चिंता

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळ उच्च न्यायालयाने राजकीय आणि धार्मिक रॅलींमध्ये मुलांचा वापर करण्यावर चिंता व्यक्त केली आहे. केरळमध्ये गेल्या आठवड्यात एका राजकीय सभेत एका अल्पवयीन मुलावर आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या आठवड्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या किनारी अलाप्पुझा येथे निघालेल्या मोर्चादरम्यान (Kerala Rally) घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगा एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण घोषणा देताना दिसत आहे.

(Kerala Rally) याबाबत न्यायमूर्ती गोपीनाथ म्हणाले की,अशा प्रकारे नव्या पिढीला प्रोत्साहन देत नाहीत का, ज्यांच्या मनात धार्मिक द्वेषाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हा हे मूल मोठे होईल, तेव्हा त्याच्या मनाला अशा वक्तृत्वाची सवय झालेली असेल. या प्रकरणात काहीतरी केले पाहिजे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केरळ पोलिसांवर एफआयआर नोंदवण्यासाठी दबाव आणल्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही व्यक्ती कोट्टायममधील एरट्टुपेटा येथील रहिवासी आहे. या रॅलीत तो मुलाला घेऊन आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी पीएफआय अलाप्पुझा जिल्हा अध्यक्ष नवस वंदनम आणि जिल्हा सचिव मुजीब यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी अलप्पुझा येथील मोर्चादरम्यान अधिकृत घोषणा करण्यात आल्या होत्या. या मोर्चात विविध ठिकाणचे अनेक कामगार सहभागी झाले होते.

या घटनेचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केले की, या घटनेचा व्हिडीओ आणि मीडिया रिपोर्ट्सने केरळला धक्का बसला आहे. द्वेषयुक्त भाषण आणि धमकावणाऱ्या घोषणा निंदनीय आहेत; मग त्यामागील राजकारण किंवा त्यांचा वापर करणाऱ्यांचा धर्म काहीही असो. दरम्यान, भाजप नेते केजे अल्फोन्स यांनी दक्षिणेकडील राज्यात वाढत्या कट्टरतावादावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हा व्हिडीओ धक्कादायक आहे. मला खरंच आश्चर्य वाटत नाही, कारण मी केरळमध्ये १०-१५ वर्षांत अशी घटना पाहिली आहे. केरळ ही इसिसची सर्वात मोठी प्रयोगशाळा बनत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button