नाशिक : सेवानिवृत्तांच्या प्रश्नांसाठी विशेष मोहीम राबविणार; समाजकल्याण विभागाचा निर्णय

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : समाजकल्याण विभागामध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत, यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रश्नासाठी विभागाच्या वतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

समाजकल्याण आयुक्तालयाने विभागाच्या विविध संवर्गांतील 160 कर्मचार्‍यांना नुकताच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे. त्या सर्व कर्मचार्‍यांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला. विभागाचे कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी कर्मचार्‍यांचे प्रश्नदेखील महत्त्वाचे असून, सर्व कर्मचार्‍यांना आयुक्तालयाच्या वतीने प्रश्नांची सोडवणूक करून न्याय दिला जात असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले. उत्कृष्ट काम करणार्‍या आदर्श कर्मचार्‍यांना गौरविण्यात येणार आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सेवाविषयक सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.

समाजकल्याण विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यातून प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याच्या जोरावर दोन वर्षांत कार्यवाही करण्यात आली आहे. – डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news