

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
जव्हार सिल्वासा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या दाेन बसेस धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांपैकी 20 ते 25 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नाशिक-सिल्वासा आणि जळगाव-सिल्वासा या दोन्ही बसेस भरसट मेटजवळील धोकादायक वळणावर स समोरासमोर आल्याने धडकल्या. बसेसची धडक होऊन अपघात झाल्याने बसमधील प्रवाशी जखमींवर जव्हार मधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.