

पुढारी ऑनलाईन डेस्क : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याबद्दल राजकीय वतुर्ळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना एका वृतवाहिनीच्या पत्रकाराने विचारले की, "सुप्रियाताई सुळे म्हणतायत की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळालेत का? आणि तेव्हा तुम्ही म्हणता की? तुम्हाला पण द्याचये का? तेव्हा सुळे म्हणतात, तुमच्याकडे आले असतील म्हणून तुम्ही त्यांना ऑफर करताय…" यावरुन प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बदद्ल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते म्हणाले, "इतकी **** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ," असं उत्तर सत्तार यांनी दिलं. यावरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "सत्तारांची मस्ती अतरवू, आम्हालाही बोलता येत पण, आम्ही तसं बोलणार नाही. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु. असे म्हणाले. राष्ट्रवादीकडून त्यांना शब्द मागे घेण्यासाठी २४ अल्टीमेटस देण्यात आला आहे.
हेही वाचा