म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार

म्हेळुस्के: गावातील विकास कामांचा शुभारंभ करताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. समवेत म्हेळुस्केच्या सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे व उपस्थित मान्यवर. (छाया: समाधान पाटील)म्हेळुस्के: गावातील विकास कामांचा शुभारंभ करताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. समवेत म्हेळुस्केच्या सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे व उपस्थित मान्यवर. (छाया: समाधान पाटील)

Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

म्हेळूस्के गावात अनेक नवनवीन सुविधा होत आहे व अजूनही अनेक काम करायची आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा निधी घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

म्हेळुस्के येथे विविध विकास कामांचा प्रारंभ डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार नेते सुरेश डोखळे, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे आदी उपस्थित होते. विविध विकास कामांमध्ये म्हेळुस्के ते ओझे रस्ता सुधारणा करणे, नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते काँक्रिटीकरण, व्यायामशाळा, स्मशानभूमीचे अनुषंगिक कामे, दलित वस्ती सुधारणा यांच्यासह अनेक कामांचा प्रारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी येथील सरपंच योगिता बर्डे व उपसरपंच योगेश बर्डे तसेच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी प्रयत्न केले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news