नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास | पुढारी

नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिलापूर येथील आझादनगरमध्ये खिडकीतून घरात शिरून चोरट्याने सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

गणेश मधुकर कहांडळ (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान, किचनच्या खिडकीतून घरात शिरून घरातील १२८ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, एक लाख ८७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल असा एकूण पाच लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button