मालेगाव : युवकावर तलवार, कुर्‍हाड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

मालेगाव : युवकावर तलवार, कुर्‍हाड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

Published on

मालेगाव : मित्रांबरोबर गप्पा मारत उभ्या असलेल्या युवकावर टोळक्याने तलवार, कुर्‍हाड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला चढवला. यात युवक जखमी झाला आहे. सैलानी चौकात इस्तियाक भजीवाल्याच्या गाडीजवळ गुरुवारी (दि.7) ही घटना घडली. शेख आदिल शेख इस्माईल (24, अमनपुरा) याने आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

तो मित्रांबरोबर उभा असताना शेख रहिम शेख अमीर, शेख इरफान शेख आमीर, शेख हुसैन शेख आमीर, शेख अफसर शेख अन्वर (सर्व रा. अय्युबनगर) हे धावून आले. शेख रहीमने वाद घालत कुर्‍हाडीने आदिलच्या डोक्यात वार केला. एकाने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविण्यात यश मिळाले मात्र इतरांनी दांड्याने मारहाण केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रत्नपारखी हे करित आहेत.तर, शेख रहीम शेख आमीर (35) याने शेख इस्माईल, सोहेब खान आरिफ खान, शेख सलमान यांनी त्याच दिवशी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news