नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून शहरासह लगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. दहा दिवसांत बिबट्याच्या दर्शनाच्या पाचपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. त्यात एका ठिकाणी बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला.

शहरासह लगतच्या गावांमध्ये बिबट्याच्या अधिवासासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. विशेषत: गांधीनगर लष्करी हद्दीसह तालुक्याचा पूर्व भाग, दारणाकाठ, आडगाव, म्हसरूळ, सय्यद पिंप्री, गंगापूर व आळंदी धरण क्षेत्र आदी परिसर बिबट्या प्रवणक्षेत्र बनले आहे. मका आणि उसाच्या शेतीसह तीन नद्यांमुळे मुबलक प्रमाणात अन्न-पाणी उपलब्ध झाल्याने त्याचे साम्राज्य विस्तारले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. बिबटयांची वाढती संख्या संघर्षाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. नाणेगाव परिसरात अमोल शिवाजी आडके या दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना गेल्या रविवारी (दि.१३) उघडकीस आली होती.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक महापालिकेच्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र व सातपूर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मनपाच्या संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसू लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याच्या भीतीने धास्तावलेले मनपा कर्मचारी कामावर जाण्यास तयार होत नसल्याची चर्चा होती. दरम्यान, बिबट्याचे माहेरघर बनलेल्या नाशिक शहरासह लगतच्या भागात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी पिंजरे तैनात करण्यात आल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील दहा दिवसांतील घटनाक्रम :

११ नोव्हेंबर : लाखलगाव परिसरातून बिबट्या जेरबंद

१३ नोव्हेंबर : नाणेगाव येथे बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

१५ नोव्हेंबर : शेवगेदारणा येथे मृत बिबट्या आढळला

१६ नोव्हेंबर : जाखोरी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

१८ नोव्हेंबर : वाडीवऱ्हे येथे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

१९ नोव्हेंबर : पाथर्डी येथे पिंजऱ्यात बिबट्या अडकला

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news