रोजगार मेळाव्याचा दुसरा टप्पा : ७१ हजार युवकांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण | पुढारी

रोजगार मेळाव्याचा दुसरा टप्पा : ७१ हजार युवकांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवकांना आज विविध ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे देशातील ७१ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. यापूर्वी दीपावलीच्या मुहूर्तावर केंद्र शासनाकडून केंद्राच्या विविध विभागात जवळपास ७५ हजार नोकरी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. यानंतर रोजगार वितरण मेळाव्याचा हा दुसरा टप्पा आहे.

देशाच्या विकासात नव्या ऊर्जेचा संचार होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून युवकांना शासनामध्ये सामावून घेतले जात आहे. या रोजगार मेळाव्या अंतर्गत केंद्र सरकारमध्ये एकूण १० लाख युवकांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात आहे. आज देशभरातील ४५ ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवनियुक्त पत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून वाटप करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रांमध्ये यूपीएससी, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे. ही निवड ही नि:पक्ष आणि पारदर्शी होणार असल्याचेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पाहा लाईव्ह रोजगार मेळावा सोहळा

हेही वाचा:

Back to top button