Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त, मध्यरात्री केला हल्ला

बिबट्या
बिबट्या
Published on
Updated on

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सामोडे येथील इंदिरानगर शिवारात बिबट्याने दोन गायींच्या वासरांवर हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात दोघाही वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सामोडे येथील इंदिरानगर जवळील गावविहीर भागात गुलाबराव शंकर शिंदे यांचे शेत आहे. या ठिकाणी गुरांचा गोठा असून त्यात बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने मध्यरात्री हल्ला (Leopard Attack) केला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यानंतर नागरिकांनी याविषयीची माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचारी ज्योती पानपाटील यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

परिसरात काही महिन्यापूर्वी एकाच वेळी तीन बिबटे दिसले होते. त्यामुळे उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वन विभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. (Leopard Attack)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news