NGT order : सांग सांग भोलानाथ…, म्हणत आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचले | पुढारी

NGT order : सांग सांग भोलानाथ..., म्हणत आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचले

पुढारी ऑनलाईन : कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने आणि पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठवला आहे. हा दंड लवकरात लवकर म्हणजे दोन महिन्यांत भरायचा आहे. मग आता.. ‘सांग सांग भोलानाथ…हा दंड पालिकेमध्ये सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षे पर्यावरणमंत्री असलेल्यांकडून की, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनेकडून वसूल करायचा का? असा प्रश्न उपस्थित करत, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.

आशिष शेलारांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यास महाविकास आघाडी सरकार आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याचे लवादाने म्हटले असल्याचे शेलारांनी नमूद केले आहे.

हेही वाचा:

Back to top button