

नाशिक सिडको : दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी ६० वर्षीय वृद्धावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संशयित कैलास पुंजू पाटील (६०, रा. गणेश चौक, सिडको) यांनी दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर येथील मोकळ्या मैदानावर दोन अल्पवयीन मुलांना घेऊन गेले व लैंगिक छळ केला. त्यांना आमिष दाखवून राहत्या घरापासून घेऊन जाऊन सोडून दिले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कैलास पाटील यांच्यावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी पाटील यांना न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :