जळगाव : कार्यकारी अभियंत्यास नऊ कोटी छत्तीस लाखाची दंडाची नोटीस

जळगाव : कार्यकारी अभियंत्यास नऊ कोटी छत्तीस लाखाची दंडाची नोटीस

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील हातनुर धरण या धरणावर नवीन आठ दरवाजांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या आठ दरवाजांचे कामासाठी धरणावर 4 हजार ब्रास वाळू साठा करण्यात आलेला आहे. याबाबत भुसावळ तहसीलदार यांनी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग 2 चे कार्यकारी अभियंता यांना नऊ कोटी छत्तीस लाख 91 हजार 190 रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण असलेले हातनूर धरणावर नवीन आठ वाढीव दरवाजांचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू चा साठाही करण्यात आलेला आहे. धरणावर असलेल्या या वाळू साठ्याची पाहणी तहसीलदार निता लबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  नुकतीच केली.

यामध्ये हातनुर धरणावर 4 हजार 94 ब्रास वाळूचा पंचनामा करण्यात आला. हा पंचनामा वरणगाव मंडल अधिकाऱ्यांनी केला होता. याबाबत कार्यकारी अभियंता नोटीस देत वाळू साठ्या बाबत विचारणा करण्यात आली होती. 2112 ब्रास वाळू बाबत 290 छायांकित प्रत सादर करण्यात आले. राज्यातील झिरो रॉयल्टी वाहतूक ईटीपी पास सादर केला नव्हता. त्यामुळे बांधकाम विभागाला वाळू साठा मोजणीचे आदेश दिल्यावर 4 हजार 93.63 ब्रास वाळू साठा मिळाला, पण गुजरात राज्यातून आणलेल्या वाळू साठ्यासोबत ईटीपी पास नसल्याने परवाना बाबत शंका उपस्थित झाली. नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार नीता लबडे यांनी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग 2  कार्यकारी अभियंता वाळूचा बाजारभाव व रॉयल्टी मिळून नऊ कोटी छत्तीस लाख 91 हजार 190 रुपयाची दंडाची नोटीस काढली आहे.

चार हजार 93 ब्रास वाढू साठेची बाजार भावानुसार किंमत एक कोटी ८२ लाख ४६ हजार ९५८ एवढी आहे याच्या पाचपट रक्कम म्हणजे 9 कोटी 36 लाख 91 हजार 190 रुपये दंड ठेवण्यात आला असून या दंडाची नोटीस 10 ऑक्टोंबर रोजी बजावण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news