‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’चे आज शानदार उद्घाटन | पुढारी

‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’चे आज शानदार उद्घाटन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांचा दसरा आणि दिवाळी खरेदीचा उत्साह द्विगुणित करणारा ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023’ शुक्रवार (दि.13) पासून सुरू होत आहे.

राजारामपुरी येथील कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह परिसरात हा फेस्टिव्हल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9.30 या वेळेत सुरू राहणार आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास रॉनिक होम अप्लायन्सेसचे तानाजी पोवार, जय किसान शक्ती आटा चक्कीचे अशोक गाडे उपस्थित राहणार आहेत

दसरा, दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच. घरात नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी आवर्जून लोक दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त निवडतात. म्हणूनच ग्राहकांना एकाच ठिकाणी भरपूर पर्याय आणि मनासारख्या खरेदीची संधी ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’ने दिली आहे. या फेस्टिव्हलमधील विविध स्टॉल्स ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

दसरा आणि दिवाळी सणांच्या खरेदीची संधी एकाच छताखाली देणारा हा फेस्टिव्हल भरपूर डिस्काऊंटसह एकाच ठिकाणी मनसोक्त शॉपिंगची पर्वणी उपलब्ध आहे. होम अप्लायन्सेस, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. सकाळी 10 ते रात्री 9.30 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला राहणार आहे. रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर आणि जय किसान शक्ती आटाचक्की या फेस्टिव्हलचे सहप्रायोजकआहेत.

गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य दालन, ऑटोमोबाईलचा स्वतंत्र विभाग, फर्निचर, आटाचक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, बेकरी उत्पादने, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. नामवंत कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक गाड्यांचा स्वतंत्र विभाग असणार आहे. त्यामुळे गाडी खरेदी करू इच्छिणार्‍यांना एकाच छताखाली सर्व नामवंत कंपन्यांच्या शोरूम्सचे स्टॉल्स उपलब्ध असून त्याच ठिकाणी गाडी बूक करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी उत्सुक असलेल्यांसाठी हा फेस्टिव्हल भरपूर व्हरायटी, अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने आणि अनेक उत्पादनांवर आकर्षक डिस्काऊंट घेऊन आला आहे.

Back to top button