

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या वाटेवर असलेल्या सोने आणि चांदीच्या दराने सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) जळगाव सुवर्णपेठेत जोरदार उसळी घेतली आहे. शनिवारच्या (दि. २१) तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २,७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ३,००० रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजी आणि डॉलरच्या घसरणीमुळे मौल्यवान धातूंना बळ मिळाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारच्या सत्रात अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दरांत दोनदा सुधारणा झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
जळगाव सुवर्णपेठेतील दरांची तुलना (विना जीएसटी):
तपशील एकूण वाढ (२१ ते २३ नोव्हेंबर)-
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)
₹ १,१३,१२० २१ नोव्हेंबर(दु.१२:४१)
₹ १,१५,२३०२३ नोव्हेंबर (दु.१२:४६)
₹ १,१५,६००२३ नोव्हेंबर (दु.१२:५०)
+ ₹ २,४८०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)
₹ १,२३,५००२१ नोव्हेंबर (दु.१२:४१)
₹ १,२५,८०० २३ नोव्हेंबर (दु. १२:४६)
₹ १,२६,२०० २३ नोव्हेंबर (दु. १२:५०)
+ ₹ २,७००
चांदी (प्रति १ किलो)
₹ १,५४,०००. २१ नोव्हेंबर (दु. १२:४१)
₹ १,५५,०००. २३ नोव्हेंबर (दु. १२:४६)
₹ १,५७,०००२३ नोव्हेंबर (दु. १२:५०)
+ ₹ ३,०००
गेल्या आठवड्यात विक्रमी नीचांकी पातळीवर आलेल्या दरांमुळे लग्नसराईची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी बाजार उघडताच दरांनी पुन्हा उसळी घेतली.
२३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४६ वाजता २४ कॅरेट सोने १,२५,८०० रुपयांवर पोहोचले होते, परंतु अवघ्या चारच मिनिटांत (१२:५० वाजता) त्यात आणखी ४०० रुपयांची भर पडून दर १,२६,२०० रुपयांवर स्थिरावले. चांदीनेही १ लाख ५७ हजारांचा टप्पा गाठला आहे.