Maharashtra cold wave: राज्यात थंडीचा कडाका वाढला; निफाडमध्ये पारा ६.५ अंशांवर, तर जळगाव ८ अंशांवर

थंड वार्‍यांमुळे ‘अक्वा‍न’ची तीव्रता झाली कमी
Winter
WinterFile photo
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यात गारठा वाढला असून, नाशिक जिल्‍ह्यातील निफाडमध्ये अचानक तापमानात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी निफाडचे किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्यात तब्बल ७.४ अंशांची घसरण होऊन पारा ६.५ अंशांवर पोहोचला.

निफाडचे तापमान महाबळेश्वरपेक्षाही (१२.४ अंश सेल्सिअस) कमी झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव येथे ८ अंश आणि नाशिकमध्ये १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

Winter
Pune Family Court Divorce Case: घटस्फोटास नकार देणाऱ्या पत्नीला न्यायालयाचा दणका; पतीचा अर्ज मंजूर, उर्वरित साडेसहा लाख स्वीकारण्याचे निर्देश

दरम्‍यान, बंगालच्या उपसागरातील ‘अक्वा‍न’ चक्रीवादळ शुक्रवारी (दि. २०) सकाळी दक्षिण ओडिशाच्या गोपाळपूर किनारपट्टीजवळ ताशी १०० कि.मी. वार्‍यांच्या वेगासह धडकले. समुद्राचे थंड पाणी, तसेच जमिनीवरील थंड वार्‍यांमुळे ‘अक्‍वान’ला म्हणावी तशी तीव्रता लाभली नाही.

दरम्यान, पुढील आठवडाभरात महाराष्ट्रासह वायव्य, मध्य, उत्तर भारतात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. जळगाव, धुळे, नाशिक गारठले आहे. राज्यात अनेक भागात आता धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.

Winter
Shantata Punekar Vachat Aahet: ३ डिसेंबरला पुणेकर पुन्हा वाचनात रमणार; ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे चौथे वर्ष

पूर्व विदर्भात वादळाच्या प्रभावामुळे किमान तापमान किंचित वाढले आहे. वादळाने मार्ग बदलल्याने विदर्भ वगळता राज्याच्या थंडीवर वादळाचा फारसा प्रभाव पडलेला नाही. राज्याच्या इतर भागात थंडीचा प्रभाव कायम आहे.

राज्‍यात काही भागांत पावसाची हजेरी

‘अक्वान’ चक्रीवादळामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

मात्र, कोकणच्या काही भागांत जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस म्हणजेच २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.