जळगाव : नवरा बायकोला माहेरी सोडण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी डाव साधला ; सोन्यावर डल्ला

File Photo
File Photo

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : येथील डि मार्ट परिसरातील बंद घरातून चोरटयांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

वैभव ठोसर (३५, आदर्शनगर) शुक्रवारी (दि.२८) पत्नी दीपिका यांना अमरावती येथे माहेरी सोडण्यासाठी गेले. तेथून शनिवारी (दि.२९) पहाटे ४.३० च्या सुमारास जळगावला घरी आले असता, घरातील २ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या साखळ्या आणि रोख ३० असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा : श्रीवल्लीची भन्नाट मराठी व्हर्जन्स ऐकलीत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news