जळगाव : चोपड्यात 4 गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत

जळगाव : चोपड्यात 4 गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चार गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या श्रीरामपूरातील दोन अट्टल गुन्हेगारांच्या जळगाव गुन्हे शाखेने चोपडा शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांमधून एक साथीदार मात्र पसार झाला आहे. तस्करीच्या कारवाईनंतर गावठी कट्टे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून उमर्टी भागातील कारखाने समूळ नष्ट करण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना काही संशयीत चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिल्याप्रमाणे पथकाने रविवार (दि.13) रात्री 12 च्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. संशयीत वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यातून 4 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनर) पसार होण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे दीपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news