क्रौर्याची परिसीमा..! ‘लिव-इन’मधील गर्लफ्रेंडचा खून, मृतदेहाचे ३५ तुकडे करुन दिल्‍लीतील विविध भागात टाकले | पुढारी

क्रौर्याची परिसीमा..! 'लिव-इन'मधील गर्लफ्रेंडचा खून, मृतदेहाचे ३५ तुकडे करुन दिल्‍लीतील विविध भागात टाकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोघेही प्रेमात पडले.  काही दिवसानंतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ राहू लागले. मात्र काही दिवसानंतर प्रेयसी लग्‍न करण्‍यासाठी आग्रह करु लागली. याच वादातून दोघाचे खटके उडू लागले. प्रियकराने प्रेयसीचा निर्घृण खून केला. मात्र यानंतर क्रौर्याची परिसीमा झाली. त्‍याने प्रेयसीचा मृतदेहाचे ३५ तुकडे केले. शहरातील विविध ३६ भागात टाकले. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रकार देशाची राजधानी दिल्‍लीत घडला असून, पाच महिन्‍यांपूर्वी घडलेला हा भयंकर गुन्‍हा आता उघडकीस आला आहे. याप्रकरणी आराोपी आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पालघरमध्‍ये राहणार्‍या आफताब पूनावाला याची मुंबईत राहणार्‍या २६ वर्षीय श्रद्धासोबत ओळख झाली. श्रद्धा मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्‍या कुटुंबीयांचा या नात्‍याला विरोध होता.  दोघेही दिल्‍लीला पळून गेले. छतरपूर परिसरात त्‍यांनी फ्लॅट भाड्याने घेतला. मे २०२२ नंतर आपला मुलीशी संपर्क झालेला नाही. मुलीचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार श्रद्धाचे वडील विकास मदन यांनी दिल्‍लीत मेहरौली पोलीस ठाण्‍यात ८ नोव्‍हेंबर रोजी दाखल केली होती. दिल्‍ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करता धक्‍कादायक माहिती समोर आली.

सहा महिन्‍यांपूर्वीच खून, मृतदेहाचे तुकडे ठेवण्‍यासाठी घेतला फ्रिज

पोलिस तपासात अनेक धक्‍कादायक खुलासे झाले. आफताब आणि श्रद्धा दिल्‍लीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ राहू लागले. काही दिवसानंतर श्रद्धा लग्‍नाचा आग्रह करु लागली. यावरुन दोघांमध्‍ये वाद होवू लागला. १८ मे २०२२ रोजीच आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. कापलेले तुकडे ठेवण्‍यासाठी फ्रीज विकत घेतला. पुढील सलग १६ दिवस तो रात्रीच्‍या वेळा घराबाहेर जावून दिल्‍लीच्‍या आसपासच्‍या परिसरात त्‍याची विल्‍हेवाट लावल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले. दिल्‍ली पोलिसांनी आफताब पूनावाला यााला छतरपूर येथील फ्लॅटमधून ताब्यात घेतले. त्‍याने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे जंगल परिसरात शोध मोहिम राबवली. घटनास्थळावरून काही हाडे सापडली आहेत. या प्रकरणी दिल्‍ली पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button