नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
बहिष्कार, नगर परिषद, बिनविरोध असे वेगवेगळे वळण घेत बहुचर्चित पिंपळगाव ग्रामपंचायत अखेर निवडणुकीच्या टप्प्यावर आली असून, तीन पॅनलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. थेट सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व सीमा आहेरराव अशी चौरंगी लढत होत आहे.
तीन पॅनलमध्ये सरळ लढत होत असून, ग्रामपंचायतीच्या 17 जागा व सरपंचपदासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी, भास्करराव बनकर, दिलीप मोरे यांच्या नेतृत्वाखालील दिव्य विकास पॅनल आणि सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष पॅनलमध्ये कडवी झुंज होणार आहे. तीनही पॅनलने प्रत्येक वॉर्डात तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा वॉर्डांत एकूण सतरा जागा आहेत, तर सरपंचपदासाठी थेट लढत होत आहे.
शहर विकास आघाडीचे उमेदवार असे : सरपंचपदासाठी गणेश बनकर, वॉर्ड एक- योगेश कडाळे, सुनीता कोल्हे, निर्मला कागदे, वॉर्ड दोन- गोरक्षनाथ वाढवणे, सुरेश खोडे, सोनाली विधाते, वॉर्ड तीन-संतोष मोरे, स्नेहा गायकवाड, वॉर्ड चार- सरला गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, सायिमा काझी, वॉर्ड पाच- बाळासाहेब बनकर, अलका वारडे, रुक्मिणी मोरे, वॉर्ड सहा- संजय मोरे, अनिता गांगुर्डे, सत्यभामा बनकर. दिव्य विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : सरपंच भास्करराव बनकर, वॉर्ड एक- कैलास मोरे, संगीता मोरे, छाया पाटील, वॉर्ड दोन- केशवराव बनकर, विनायक खोडे, सोनाली जाधव, वॉर्ड तीन- सुहास मोरे, ज्योती शेवरे, वॉर्ड चार- अमोल बागूल, दत्तात्रेय मोरे, रेखा लभडे, वॉर्ड पाच- किशोर मोरे, हिराबाई दळवी, प्रतिभा बनकर, वॉर्ड सहा- दशरथ मोरे, सपना बागूल, जयश्री बनकर.
संघर्ष पॅनलचे उमेदवार असे : सरपंच सतीश मोरे, वॉर्ड एक- भारत मोगल, शीतल मोरे, सुशीला भंडारे, वॉर्ड दोन- अल्पेश पारख, बापूसाहेब पाटील, सुशीला विधाते, वॉर्ड तीन- सत्यजित मोरे, सावित्री गांगुर्डे, वॉर्ड चार- सुदर्शन गांगुर्डे, प्रकाश काठे, प्रीती गावडे, वॉर्ड पाच- राजेंद्र भवर, तेजस्विनी भोई, नीलम बागूल, वॉर्ड सहा-प्रवीण मोरे, आचल सूर्यवंशी, सविता काळे.