Dhule News : डॉ. पाटील, पारख, प्राचार्य भामरें यांना राजर्षि छत्रपती शाहु महाराज पुरस्कार

Dhule News : डॉ. पाटील, पारख, प्राचार्य भामरें यांना राजर्षि छत्रपती शाहु महाराज पुरस्कार

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील मालपूर कासारे येथील भुमिपुत्र डॉ. विजय दौलत पाटील, सुरेश सोनरज पारख व प्राचार्य बी. एम. भामरें यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे येथील श्री दत्त अवधुत कृपा मंडळ व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नवी दिल्ली यांच्या वतीने दत्त जयंती निमित्त साजरा होत असलेल्या भजन किर्तन सप्ताहात समाजासाठी केलल्या योगदानाबद्दल साक्री तालुक्यातील कासारे येथील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीद असलेले, वैद्यकीय क्षेत्रात करत असलेल्या भरीव अशा सेवाभावी योगदानाबद्दल, डॉ. विजय दौलतराव पाटील, प्राचार्य बी.एम.भामरे मालपूर यांना तसेच कासारे येथील प्रसिद्ध उद्योजक व नेत्रदोषी रुग्णांसाठी गेल्या पंधरा वर्षापासून मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करणारे सुरेश पारख यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन धुळे येथील श्री दत्त अवधुत कृपा मंडळ व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एन. सी.पाटील फार्मसी विद्यालयाच्या पटांगणात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार सन्मान पत्र प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह किर्तनकार हभप.युवराज महाराज, हभप.ज्ञानेश्वर महाराज प्रतापूरकर, धुळ्याचे नगरसेवक नरेश चौधरी, श्याम दादा, योगेंद्र पाटील, अणुष पाटील आदीं मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.मंजुळा गावीत, ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष जे.टी.देसले, बी.एस. पाटील, बी.डी.देसले, प्रेमकुमार अहिरे, उत्तमराव देसले, गोकुळ परदेशी, विशाल देसले, सरपंच सुवर्णा देसले, पोलीस पाटील दिपक काकुस्ते, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापारी, डॉक्टर व मेडिकल असोसिएशन धार्मिक निसर्ग मित्र समिती यांचेतर्फे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news