Rahul Meets Wrestlers : राहुल गांधी थेट कुस्तीच्या आखाड्यात; पैलवानांकडून शिकले डावपेच | पुढारी

Rahul Meets Wrestlers : राहुल गांधी थेट कुस्तीच्या आखाड्यात; पैलवानांकडून शिकले डावपेच

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी (दि.२७) सकाळी हरियाणामधील झज्जरमध्ये पैलवानांच्या आखाड्यात पोहचले. छारा गावातील वीरेंद्र आर्य आखाड्यात त्यांनी बजरंग पुनियासह कुस्तीपटूंची भेट घेतली. तेथे त्यांनी पैलवानांच्या कसरती पाहिल्या. त्यांच्यासोबत व्यायाम केला आणि त्यांच्याकडून कुस्तीतील काही डावही शिकून घेतले. (Rahul Meets Wrestlers)

संबंधित बातम्या : 

ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे भारताची ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला. विनेश फोगटने अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केले. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली. या निर्णयाचे कुस्तीपटूंनी स्वागत केले. (Rahul Meets Wrestlers)

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आज कुस्तीपटूंना भेटण्यासाठी हरियाणाचा कुस्तीपटू दीपक पुनियाच्या गावी पोहोचले आहेत. सकाळी ६.१५ च्या सुमारास त्यांनी छारा गावातील वीरेंद्र आखाड्यात पैलवानांची भेट घेतली. यावेळी बजरंग पुनियाही उपस्थित होते. छारा गाव हे कुस्तीपटू दीपक पुनिया यांचे गाव आहे. दीपक आणि बजरंग पुनिया यांनी या वीरेंद्र आखाड्यातूनच कुस्तीला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button