तरूणांनी वाचन संस्कृती जोपासून साहित्याची निर्मिती करावी : प्रा.डॉ.राजा दीक्षित | पुढारी

तरूणांनी वाचन संस्कृती जोपासून साहित्याची निर्मिती करावी : प्रा.डॉ.राजा दीक्षित

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : “आजच्या महाविद्यालयीन तरुणांनी वाचन संस्कृती जोपासून ज्ञानाची आवड निर्माण करणाऱ्या साहित्याची निर्मिती करावी. ज्ञानाच्या कक्षा रूंदाविण्यासाठी ग्रंथ व पुस्तक ही आजच्या काळाची जीवनावश्यक गरज बनवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांनी केले. कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य व एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

संबंधित बातम्या : 

यावेळी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे, स्कूल कमिटीचे चेअरमन धनराजशेठ जैन, प्राचार्य डॉ.के.डी कदम, मंडळाचे सहाय्यक संतोष गेडाम, रवींद्र घोडराज, डॉ. देशमुख, डॉ.वाल्मीक शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. दीक्षीत म्हणाले की, “पुस्तकांशी मैत्री करा. आजच्या महाविद्यालयीन तरुणांना प्रश्न पडले तर उत्तर आपोआप सापडते. स्पर्धा परीक्षा द्या पण त्यासोबतच इतर पर्याय ठेवा. वाचन संस्कृती आज तीन पातळीवर वाटचाल करीत असून यामध्ये शासन, संस्था व व्यक्ती या माध्यमातून संवर्धन होत आहे, असे ते म्हणाले. विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत देवरे म्हणाले की, पिंपळनेरला आल्यावर आम्ही तीर्थक्षेत्राला आल्यासारखे वाटतेय. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांनी विश्वकोश खंडाच्या तीन प्रती महाविद्यालयाला भेट दिल्यात. या कार्यक्रमासाठी डॉ.बी.सी.मोरे, प्रा.संजय खोडके प्रा.के. आर.राऊत, प्रा.नरेंद्र खैरनार, डॉ.तोरवणे, प्रा. डी.बी.जाधव, डॉ.एन.बी. सोनवणे, प्रा.वसावे, प्रा.सी. एन.घरटे, प्रा.उगल मुगले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक मराठी विभाग सहायक प्रा.एल.जी.गवळी यांनी केले. प्राचार्य डॉ.के.डी.कदम यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश म्हस्के यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक वाय.एम.नांद्रे यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button