नाशिक : नायगाव खोऱ्यात चौथा बिबट्या जेरबंद | पुढारी

नाशिक : नायगाव खोऱ्यात चौथा बिबट्या जेरबंद

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नायगाव खोऱ्यात (शनिवार) रात्री चौथा बिबट्या रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. विशेष म्हणजे भांगरे वस्तीवरच हे चारही बिबटे पिंजऱ्यात रेस्क्यू करण्यात आले आहेत.

नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने झेप सामाजिक विचार मंच यांनी नाशिक पश्चिम वन विभाग, उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार RFO सिन्नर मनीषा जाधव यांना नागरिकांवर बिबट्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन दिले होते.

त्‍यावर प्रत्यक्ष नायगावमध्ये टीमसह रात्री येऊन नाईट डिव्हिजन ड्रोन सर्वे करून टीमला सूचना दिल्या. पंधरा दिवसाच्या आत सलग चार बिबटे दोन मादी, दोन नर बिबटे जेरबंद केले. चारही बिबटे जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम वनपाल अनिल साळवे, वनरक्षक संजय गीते, गोविंद पंढरी, वनसेवक मधु शिंदे, बालम शेख, सहाने, पंकज कुराडे, गणपत मेंगाळ या सर्व टीमने काम केले.

हेही वाचा :  

Back to top button