बारीपाडा येथील चैत्राम पवार यांची राज्याच्या वन्यजीव मंडळावर निवड 

 चैत्राम पवार
चैत्राम पवार

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

आदिवासी पश्चिम पट्ट्यातील बारीपाडा येथील जैवविविधता समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार, अभ्यासक डॉ. अंकुर पटवर्धन, वन्यजीव अभ्यासक अनुज खरे, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख नेहा पंचमिया यांसह विविध जिल्ह्यांतील अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून मंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती प्रलंबित होती. वन विभागाने बुधवारी सरकारी अध्यादेश प्रसिद्ध करून नवीन सदस्यांची नावे जाहीर केली.

गेल्या दीड-दोन वर्षांतील राजकीय घडामोडीनंतर पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या सर्व समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बरखास्त केल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळाच्या बैठका झाल्या.

अशासकीय सदस्यांच्या सदस्यांमध्ये विधानसभा सदस्यांसह बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ कॉन्झव्हेंशन ट्रस्ट, टायगर रिसर्च कॉन्झव्र्हेशन ट्रस्ट या संस्थांसह डॉ.अंकुर पटवर्धन, नेहा पंचमिया, रमण कुलकर्णी, अनुज खरे, किरण शेलार, प्रवीण परदेशी, धनंजय बापट, श्रीकांत टेकाडे, चैत्राम पवार, विनायक चलकर आदींचा समावेश आहे. नियुक्तीबाबत सातत्याने झालेल्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने नवीन सदस्यांची निवड जाहीर केली.

हेही वाचा ;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news