पिंपरी शहर वाहतूक विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर | पुढारी

पिंपरी शहर वाहतूक विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड वाहतूक विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर आला आहे. गुरुवारी (दि. 27) एकाच दिवशी ट्रीपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्म्ट, तसेच धोकदायक पद्धतीने दुचाकी चालविणार्‍या 486 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालय आणि निगडी येथून कारवाईला सुरवात करण्यात आली.

वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक महाविद्यालयाबाहेर कारवाईला सुरवात झाली. यावेळी मोटार वाहन कायद्यानुसार 486 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी ट्रीपल सीट जाणार्‍या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवून ट्रीपल सीट जाणार्‍या तसेच वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहनाची कोणतीही कागदपत्र नसलेल्या चालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्मेट तसेच नो-एन्ट्रीतून येणार्‍या चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान ट्रीपल सीटच नव्हे तर एकाच दुचाकीवरून चारजण प्रवास करताना मिळून आले. यामध्ये तरुणी देखील आघाडीवर असल्याचे पहावयास मिळाले. त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे महाविद्यालयाबाहेर घिरट्या घालणारे टवाळखोर सैरभैर झाले आहेत.

हेही वाचा

अवैध गौण खनिज माफियांचा धुमाकूळ; जेऊर परिसरात रात्रीस चाले खेळ

केरळच्या युवकाने सर केले २७० गड-किल्ले, वर्षभरात हजारो किमी सायकलप्रवास

नागापेक्षाही जहाल विषारी साप!

Back to top button